Video | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

Video | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची केली विचारपूस

| Updated on: Feb 03, 2024 | 3:52 PM

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी काल उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया करुन त्यांच्या शरीरातील सहा गोळ्या काढण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज देखील आता बाहेर आले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. या रुग्णालयात त्यांच्यावर शस्रक्रिया करुन त्यांच्या शरीरातील सहा गोळ्या काढण्यात आल्या आहेत. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन जखमी महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

Published on: Feb 03, 2024 03:52 PM