Video | रामलल्लासाठी सात दिवसाचे सात रंगाचे कपडे तयार, पाहा कोणावर सोपविली जबाबदारी ?
येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि इतर प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत. यावेळी रामलल्लाला खास पोशाख शिवण्यात आले आहे. रामलल्लाला सात दिवसाचे सात रंगाचे खास पोशाख शिवण्यात आले आहेत.
अयोध्या | 1 जानेवारी 2023 : अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील पाहुणे येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा होणार आहे. या वेळी भगवान रामलल्ला यांची मूर्ती गर्भगृहात विराजमान होणार आहे. या रामलल्लाच्या मूर्तीला खास पोशाख शिवण्याची जबाबदारी अयोध्येतील टेलर भागवत पहाडी यांच्यावर सोपविली आहे. परंपरागतपणे देवतांचे पोशाख तयार करीत आले आहेत. भगवत प्रसाद पहाडी यांचे वडील बाबूलाल टेलर यांच्याकडून ते पोशाख तयार करण्यास शिकले आहेत. भगवतप्रसाद पहाडी, शंकरलाल हे दोघे भाऊ काम करीत आले आहे. दहा बाय बाराच्या खोलीत रामलल्लासाठी दर वाराला वेगवेगळ्या रंगाचे पोशाख शिवलेले आहेत. रामलल्लाच्या नवीन मूर्तीसाठी पोशाखाची ऑर्डर अद्याप दिलेली नाही. संपूर्ण अयोध्येतील राम मंदिराचे देवतांचे पोशाख येथेच शिवून मिळतात.