Video | नथुराम गोडसे भारतातील पहिला अतिरेकी, जितेंद्र आव्हाड यांनी केला हल्लाबोल
महात्मा गांधी यांची हत्या नथुराम याने केली नाही असा दावा रणजीत सावरकर यांनी त्यांच्या 'मेक शुअर गांधी इज डेड' या पुस्तकात केला आहे. यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी असल्याची टीका केली आहे. नथुराम गोडसे यांनी गोळीबार करताना त्या घटनास्थळी काकासाहेब गाडगीळ होते. त्याने त्याला ओळखले होते. नेहरु आणि गांधी यांना बदनाम करायचा कट गेली अनेक वर्षे सुरु आहे आता तो फोफावला आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
मुंबई | 29 जानेवारी 2024 : रणजीत सावरकर यांनी लिहीलेल्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकांत महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे याच्या गोळीबाराने झाली नाही असा दावा केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या पुस्तकावर संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी होता असा हल्ला जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी लेखक रणजित सावरकर यांना थोतांड पसरवून राज्यसभेला आपण फिट आहोत हे भासवायचे असेल अशी टीका केली आहे. गांधीजींना मग अदृश्य शक्तीने मारले काय ? उद्या ते असेही म्हणतील गांधीजींचा स्वातंत्र्यलढ्यात सहभागच नव्हता. नेहरु आणि गांधी यांना बदनाम करायचा कट गेली अनेक वर्षे सुरु आहे आता तो फोफावला आहे. लोक हुशार आहेत लोकं मुर्ख नाहीत. याआधीही नथुरामने गांधीजींवर हल्ला केला होता. महाबळेश्वर, पांचगणी येथे कॉंग्रेसच्या अधिवेशनात गांधींवर नथुरामने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या कमळे गुरुजींनी त्याला उचलून आपटले होते. गांधीजी मध्ये पडले म्हणून नथुराम वाचल्याचे आव्हाड यांनी सांगितले. अशा प्रवृत्तींनी पाच वेळा गांधींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता असेही आव्हाड यांनी सांगितले.