Amravati | अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण, दुकानांची आणि दुचाकीची तोडफोड
अमरावतीत पोलीस आणि आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे.
त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चा करांनी जयस्थभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.
मोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांनी भाजप विरोधात व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या मुस्लिम मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागले