‘लालपरी’चा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, एका हातात स्टेरिंग अन् दुसऱ्या हातात…
VIDEO | छप्पर उडालेल्या बसच्या व्हायरल व्हिडीओनंतर आणखी एक व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
गडचिरोली, 20 जुलै 2023 | गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगारातील छप्पर उडालेल्या बसचा व्हिडीओ नुकताच सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. गडचिरोलीतील अहेरी बस आगाराच्या छप्पर फाटलेल्या लाल परीचा व्हिडिओ सध्या राज्यभर तुफान गाजत असताना, याच आगाराच्या एका बसचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. भर पावसात बसचा वायपर बंद झाल्याने एका हाताने स्टेरिंग आणि एका हाताने वायपर फिरवण्याची वेळ चालकावर आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे अहेरी आगारातील भंगार बस गाड्यांचा विषय ऐरणीवर आला असून प्रवाशांचा जीव आता टांगणीला लागला आहे. अहेरी आगाराची आसरअल्ली बस प्रवाशांना 120 किलोमीटर अहेरीकडे घेऊन येत असताना रात्र झाली. त्यातच मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र बसचे वायपर काम करत नसल्याने समोरचे काहीही दिसणे चालकाला कठीण झाले. त्यामुळे चालकाने चक्क एका हाताने स्टिअरिंग तर एका हाताने वाइपर फिरवत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे.

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?

हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला

'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार

पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
