Ashish Shelar LIVE | पंकजा मुंडे यांचं काही दबावतंत्र नाही – भाजप आमदार आशिष शेलार
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे. (ashish shelar)
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे यांचं कोणतंही दबाव तंत्र नाही. त्या असं काही करणार नाहीत, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
आशिष शेलार पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. कोणतंही दबाव तंत्र नाही. पंकजा मुंडे कधी असं करत नाहीत, करणार नाहीत. कधी कधी कार्यकर्त्यांच्या भावनाचा आक्रोश होतो. तो काही पक्ष द्रोह असल्याचं मानण्याचं कारण नाही, असं शेलार यांनी स्पष्ट केलं. तसेच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नाराजीच्या बातम्यांवर उत्तर दिलं आहे. त्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही, असंही त्यांनी सांगितलं.