VIDEO : Pankaja Munde on Vinayak Mete Death | ‘त्यांच्या जाण्यानं मला फार मोठा धक्का बसलेला आहे’
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीयं. पंकजा मुंडे म्हणाल्या की, खरोखरच विनायक मेटेंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. मला सकाळी स्वत: चंद्रकांत पाटील यांनी फोन करून याबाबत माहिती दिलीयं.
विनायक मेटे यांच्या अपघाती निधनावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीयं. पंकजा मुंडे म्हणाल्या की, खरोखरच विनायक मेटेंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. मला सकाळी स्वत: चंद्रकांत पाटील यांनी फोन करून याबाबत माहिती दिलीयं. मात्र, ते गंभीर असल्याचे सांगितले गेले होते अगोदर, माझी आणि त्यांची काही दिवसांपूर्वीच सागर बंगल्यावर भेट झाली होती, आम्ही बऱ्याच वेळ जिल्हातील प्रश्नांबाबत चर्चा केली. तसेच सोबत मिळून कसे काम करता येईल यावर देखील आमचे बोलणे झाले. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांनी जन्म घेऊ संघर्ष केला. ते चार वेळा आमदार होते. मलाच एकच वाटते की, त्याचे हे जाण्याचे वय नव्हते अत्यंत धडधाकट माणूस अपघातामध्ये जातो हे अत्यंत दुदैवच म्हणावे लागेल.
Published on: Aug 14, 2022 09:12 AM
Latest Videos