ठाकरे गटाच्या नेत्यानंतर आता विरोधी पक्ष नेत्याचाही शिंदे गटाच्या खासदारांबाबत मोठं वक्तव्य

ठाकरे गटाच्या नेत्यानंतर आता विरोधी पक्ष नेत्याचाही शिंदे गटाच्या खासदारांबाबत मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 06, 2023 | 2:47 PM

राऊत यांनी महायुती बिघाडी होईल, तर शिंदे गटाच्या खासदारांचा पत्ता कट होईल असे म्हटलं होतं. तर राऊत यांनी शिंदे गटाच्या तेरा खासदारांपैकी फक्त खासदारांनाच उमेदवारी मिळेल असेही म्हटलं होतं.

पुणे, 06 ऑगस्ट 2013 | आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने सध्या सर्व्हे बाहेर येत आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी महायुती बिघाडी होईल, तर शिंदे गटाच्या खासदारांचा पत्ता कट होईल असे म्हटलं होतं. तर राऊत यांनी शिंदे गटाच्या तेरा खासदारांपैकी फक्त खासदारांनाच उमेदवारी मिळेल असेही म्हटलं होतं. त्याचमुद्द्यावरून विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेट्टीवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. वड्डेट्टीवार यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर बोलताना, हे फोडाफोडीचे राजकारण जनतेला पटलेलं नाही. त्यामुळे याचे उत्तर जनता निवडणुकीत देईल असे म्हटलं आहे. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना काही आमदार आणि नेते सोडून गेले. पण त्याचा परिणाम त्यांच्या पक्षावर होणार नाही असे देखील त्यांनी म्हटलं आहे. तर शिंदे गटातील फक्त दोनच खासदार आगामी लोकसभेच्या निवडणुकीत निवडून येतील असे सर्व्हेवरून समोर येत असल्याचं वड्डेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Published on: Aug 06, 2023 02:47 PM