Uadayanraje-Sambhajiraje Meet | उदयनराजे-संभाजीराजेंच्या भेटीवर विनायक मेटेंची पहिली प्रतिक्रिया
राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षीत असलेली खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाबाबत एकमत असल्याचं सांगितलं.
राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षीत असलेली खासदार संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली. दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाबाबत एकमत असल्याचं सांगितलं. राज्यकर्त्यांनी मराठा आरक्षणप्रश्नी एकत्र येऊन समाजाचा प्रश्न मार्गी लावावा, असं आवाहन संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांनी केलं.
या भेटीसाठी दोन्ही राजे कालच पुण्यात दाखल झाले होते. मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांनी सर्व राजकीय नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज ते खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच या दोघांची भेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी बऱ्याच उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आज अचानकपणे संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या भेटीची माहिती समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना विनायक मेटे म्हणाले की, चांगलं आहे, साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी यांची भेट झालीच पाहिजे.