Special Report | चिपी विमानतळावरून कोकणात राणे- राऊतांच्या वादाचं टेक ऑफ
चिपी विमातळावरून मागील काही दिवसांपासून राणे आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.
चिपी विमानतळासाठी अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही 7 तारीख कोठून आणली आहे. हे काय कागदाचं विमान उडवणार आहेत का ? असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांना केला. तसेच आम्हाला एक बुद्धू खासदार मिळाला आहे, अशी बोचरी टीकादेखील राणे यांनी राऊत यांच्यावर केली. विनायक राऊत यांनी देखील नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. गेल्या 25 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं होतं. मात्र, मी खासदार झाल्यापासून विमानतळाच्या कामाला गती मिळाल्याचं विनायक राऊत म्हणाले आहेत.
अजूनही डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही
चिपी विमातळावरून मागील काही दिवसांपासून राणे आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु आहे. त्यातच येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. त्यांच्या या माहितीनंतर कोकणवासी आनंद व्यक्त करत आहेत. मात्र, राऊत यांच्या घोषणेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राऊत यांचा समाचार घेतलाय. चिपी विमातळावरुन विमानोड्डाण करण्यासाठी अजून डीजीएसएची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ही सातची तारीख त्यांनी कोठून आणली आहे. ते एकटे राहून कागदाचे विमान उडवणार आहेत का ? आम्हाला एक बुद्धू खासदार मिळाला आहे, असे नितेश राणे म्हणाले.