अजित पवार यांनी शरद पवार यांनी गुप्त भेटीत दिली भाजपची ऑफर; विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांचा मोठा दावा,

अजित पवार यांनी शरद पवार यांनी गुप्त भेटीत दिली भाजपची ऑफर; विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांचा मोठा दावा,

| Updated on: Aug 16, 2023 | 12:14 PM

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून मोठा दावा केला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. याचदरम्यान आता विरोधी पक्ष नेते वियज वडेट्टीवार यांनी देखील मोठा दावा केल्याने आता एकच खळबळ उडालेली आहे.

नागपूर : 16 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार-शदर पवार यांची भेट ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. तर अजित पवार-शदर पवार भेटितील राजकारण हे रंजक वळण आले आहे. यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली असून काँग्रेस नेत्यांना या भेटीवरून काही दावे केले आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरून दावा केल्यानंतर आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील मोठा दावा केला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात आता प्रचंड खळबळ उडालेली आहे. यावेळी वडेट्टीवार यांनी, शरद पवार यांना भाजपमध्ये आणा असा सुचना केंद्रीय नेतृत्वाने अजित पवार यांना दिल्या आहेत. तर त्यांनी तसे केल्यास त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केलं जाईल अशी अट घातल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय.

Published on: Aug 16, 2023 12:14 PM