Kiran Rijiju : वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे, संसदीय मंत्री किरेन रिजिजूंनी सादर केलं वक्फविधेयक
Waqf Amendment Bill : लोकसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक २०२४ वर आज चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले आहे.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे. आता वक्फमध्ये शिया, सुन्नी, बोहरा, मागासवर्गीय मुस्लिम वर्ग, बिगर मुस्लिम तज्ञ आणि महिला देखील असतील. वक्फ बोर्डात ४ बिगर-मुस्लिम सदस्य असू शकतात आणि त्यापैकी २ महिला असणे आवश्यक आहे. आम्ही हे विधेयक आणलं नसतं तर संसदेवरही वक्फने दावा सांगितला असता, असं केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हंटलं आहे. आज लोकसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक २०२४ वर चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय संसदीय मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले आहे.
यावेळी बोलताना रिजिजू म्हणाले की, २०१३ मध्ये निवडणुकीसाठी फक्त काही दिवस शिल्लक होते. ५ मार्च २०१४ रोजी १२३ प्रमुख मालमत्ता दिल्ली वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. निवडणुकीला काही दिवस शिल्लक होते, तुम्ही वाट पाहायला हवी होती. तुम्हाला वाटलं होतं की तुम्हाला मते मिळतील, पण तुम्ही निवडणूक हरलात. तुम्ही म्हणालात की कोणताही भारतीय वक्फ बनवू शकतो. आम्ही हा मुद्दा पुन्हा एकदा मांडला आहे की ज्या व्यक्तीने किमान पाच वर्षे इस्लामचे पालन केले आहे तोच वक्फचा दावा करू शकतो, असंही यावेळी रिजिजू म्हणाले.
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

