Waqf Amendment Bill 2025 : वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री बील पास
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक काल मध्यरात्री मंजूर करण्यात आलं आहे. विरोधकांकडून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला असंवैधानिक ठरवण्यात आले.
लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मध्यरात्री दीड वाजता मंजूर करण्यात आलं आहे. २८८ विरूद्ध २३२ मतांनी लोकसभेमध्ये हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. १४ तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मध्यरात्री लोकसभेत मंजूर करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनात २८८ मतं पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केलं होतं. काल मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत लोकसभेचं कामकाज सुरू होतं.
दरम्यान, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर आता राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात येणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आल्यानंतर अमित शाह आणि पीयूष गोयल यांच्यात यासंदर्भात एक बैठक झाली. राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
वक्फ बोर्डावर आधी मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होते. मात्र सुधारित विधेयकानुसार गैर मुस्लिम सदस्यांचा समावेश करणं बंधनकारक करण्यात आले आहे. आधी सरकारकडून वक्फ बोर्डावर चार सदस्यांची नियुक्ती करण्यात येत होती आणि चार सदस्य निवडून येत होते. पण आता वक्फ बोर्डाच्या सुधारित विधेयकानुसार ८ सदस्यांमध्ये किमान २ सदस्य गैर मुस्लिम असणार आहे.

माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा

आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?

5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्

अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल
