“चार वारकऱ्यांना वीस पोलिसांनी मारहाण केली”, मारहाण झालेल्या वारकऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल!
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला.
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र या पालखीला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करण्यावरून मंदिर परिसरात वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांवर पोलिसांनी लाठीमार केला. यावरून आता चांगलंच राजकारण रंगत आहे. यादरम्यानच, मारहाण झालेल्या वारकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. “मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. आमचं म्हणणं होतं की आम्हाला प्रस्थान सोहळ्याला सोडा, ते दरवर्षी सोडतात. पण, अचानक ठरलं की आम्हाला आत सोडायच नाही. आम्हा चार विद्यार्थ्यांना वीस पोलिसांनी मारहाण केली. एकांतात घरात नेऊन मारलं आहे. आमच्यावर हात उचलला. भविष्यात इतर वारकऱ्यांवर हात उचलू शकतात. पोलिसांनी मारहाण का केली? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावं”, असं वारकरी म्हणाला. या वारकऱ्यांचे नाव विशाल पाटील असे आहे.