Video: महागाईचं समर्थन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांना केतकी चितळेचा अभिमान! म्हणाले, ‘बिचारी….’
Ketaki Chitale Sadabhau Khot : न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं सांगतानाच तुम्ही केलं तर पाटलांच्या पोराने केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा, असंही ते म्हणालेत.
अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) हिच्या शरद पवारांवरील (sharad pawar) पोस्टवर सर्वच राजकीय पक्षांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. मात्र, रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केतकीच्या फेसबुक पोस्टचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केतकी चितळेचा मला अभिमान असल्याचे सांगत सदाभाऊ खोत यांनी केतकीचं समर्थन केलं आहे. केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही, तिला मानावे लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं सांगतानाच तुम्ही केलं तर पाटलांच्या पोराने केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा हा प्रस्थापितांविरोधात आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

