‘या खेकड्यांना जपलं असतं तर सेना फुटली नसती...’; गूलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

‘या खेकड्यांना जपलं असतं तर सेना फुटली नसती…’; गूलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार

| Updated on: Jul 25, 2023 | 2:08 PM

त्यांनी शिंदे दिल्लीत जाऊन मुजरा करतात असं म्हटलं होतं. तर शिंदे गटाला खेकड्याची उपमा दिली. त्यांनी, माझं सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं असं म्हटलं आहे.

मुंबई, 25 जुलै 2023 | माजी मुख्यमंत्री, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत! “आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!” या शीर्षकाखाली प्रसिद्ध होणार आहे. मात्र त्याच्या आधी त्याचा टिझरला लाँच करण्यात आला आहे. यामधून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून टीका केली आहे. त्यांनी शिंदे दिल्लीत जाऊन मुजरा करतात असं म्हटलं होतं. तर शिंदे गटाला खेकड्याची उपमा दिली. त्यांनी, माझं सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं असं म्हटलं आहे. त्यावरून आता शिंदे गटाचे नेते, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. यावेळी त्यांनी, खेकडा हा गुणकारी प्राणी असतो. तो कावीळवर योग्य पर्याय ठरतो असा टोला ठाकरे यांना लगावला आहे. तर आम्हाला खेकडे म्हणता पण जर हेच खेकडे तुम्हा सांभाळले असते तर शिवसेना फुटली नसती. बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जाताय ही चांगली बाब आहे. पण आपण कोणाबरोबर बसलो आहोत हे ही एकदा तपासायला हवं असे देखील त्यांनी म्हटलं आहे. तर आम्हाला एक कळत नाही आमचा दोष काय होता. आत्ता कोण कुठे जाऊन मुजरा करतो हे पाहावं लागेल. तुम्ही दिल्लीत जाऊन राम राम करायचा तेव्हा असाही सवाल त्यांनी यावेळी ठाकरे यांना केला आहे.

Published on: Jul 25, 2023 02:08 PM