जाहिरातीवरून शिंदे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य; म्हणाला, ‘जाणीवपूर्वक चूक; पण शिंदे आणि फडणवीस याचं नातं…’
कितीही माणूस हुशार असला तरी जाहिरात देताना चुका होतात. जाहिरात म्हणजे स्वत:चं मत आहे, असं मला वाटतं नाही. आम्हीही गाव पातळीवर कधी कधी जाहिराती देतो, त्यात सरपंचाचा फोटो राहून जातो. हे मोठ्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मनात त्या गोष्टी येऊ शकतात.
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सध्या एका जाहिरातीमुळं तणाव निर्णाण झाला होता. ज्यानंतर फडणवीस यांच्यासह भाजपची समजूत काढण्यासाठी दुसरी जाहिरात देण्यात आली. यानंतर ही बॅनरबाजीतून शिंदे गटावर भाजपकडून टीका होत आहे. यावरून शिंदे गटाचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात आयलव्हयूचं नातं असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी हे मोठं वक्तव्य जाहिरातीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये उफाळून असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केलं आहे. तर कितीही माणूस हुशार असला तरी जाहिरात देताना चुका होतात. जाहिरात म्हणजे स्वत:चं मत आहे, असं मला वाटतं नाही. आम्हीही गाव पातळीवर कधी कधी जाहिराती देतो, त्यात सरपंचाचा फोटो राहून जातो. हे मोठ्या नेत्यांचे फोटो असल्यामुळे साहजिकच प्रत्येकाच्या मनात त्या गोष्टी येऊ शकतात. जाणीवपूर्वक चूक झाली असं मला वाटत नाही. चूक लक्षात आल्यानंतर ती दुसऱ्या दिवशी दुरुस्त केली गेली. मनात तसं नव्हतं म्हणून चूक दुरुस्त केली, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. उद्या राष्ट्रवादीने काँग्रेसची तशी जाहिरात दिली आणि चूक झाली तर असंही गुलाबराव पाटील म्हणाले.