Mumbai ला पाणीपुरवठा करणारं धरण ९० टक्के भरलं, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पण..

Mumbai ला पाणीपुरवठा करणारं धरण ९० टक्के भरलं, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, पण..

| Updated on: Sep 02, 2023 | 5:21 PM

VIDEO | मुंबईकरांची पाण्याची चिंता काही अंशी मिटलेली असून मुंबईला पाणीसाठा करणारे धरण 90 टक्के भरले, मुंबईला दररोज 3900 mld पाण्याची गरज लागते आणि तेवढे पाणी पुरवलेही जाते. मात्र सप्टेंबरमध्ये पाऊस पडला नाही तर...

ठाणे, २ सप्टेंबर, २०२३ | मुंबईकरांची पाण्याची चिंता काही अंशी मिटलेली असून मुंबईला पाणीसाठा करणारे धरण 90 टक्के भरले आहेत. मुंबईला दररोज 3900 mld पाण्याची गरज लागते. तेवढे पाणी पुरवले देखील जाते. त्यातील पिसे पांजारपोळ या धरणातून आता 2100 mld पाणी शुद्धीकरण करून वापरात आणले जाते. यासाठी एकूण 18 पंपिंग मशीन असून सध्या स्थितीला धरणाचे पाणी न वापरता पावसाचे वाहून आलेल्या पाण्याचा वापर केला जातं आहे. पिसे पांजारपोळ या धरणातील दररोज 1500 ते 1800 mld पाणी शुद्धीकरण केले जाते आणि ते मुंबईतील वॉटर स्टोरेज रूमला पाठवले जाते. सध्यस्थितीत पावसाची योग्य हजेरी असल्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे. परंतु सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला नाही तर मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Published on: Sep 02, 2023 05:21 PM