Railway Mega Block : मुंबईकरांनो ‘या’ रेल्वेमार्गावरून प्रवास करताय? तर गैरसोय होणार, मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
11 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता ब्लॉक सुरु होईल तो सकाळी 8.30 वाजेपर्यत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर असेल आणि रात्री 12.30 ते सकाळी 6.30 दरम्यान डाऊन जलद मार्गावर असणार आहे. 12 एप्रिल रोजी रात्री 11.30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि डाऊन जलद मार्गावर रात्री 11.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबकरांनो… तुम्ही जर लोकल ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मुंबई लोकल रेल्वे मार्गातील पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या रात्र कालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसांत घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे तब्बल 334 लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची मोठी गैरसोय होणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहीतीनुसार माहीम आणि वांद्रे स्थानाकांदरम्यानच्या ब्रिज क्र.20 च्या रिगर्डरिंगसाठी महत्वाचा 9.30 तासांचे नाईट ब्लॉक 11 एप्रिल ( शुक्रवार रात्री), आणि 12 एप्रिल ( शनिवारी रात्री ) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, माहिम-वांद्रे रेल्वे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी रात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान उपनगरीय लोकल सेवासह मेल एक्स्प्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात येणार आहे. आज रात्री 10.23 नंतर सर्व लोकल मुंबई सेंट्रल-सांताक्रुझ दरम्यान केवळ जलद मार्गावरून धावणार आहेत. तर चर्चगेट-विरार शेवटची लोकल शनिवारी रात्री 10.53 वाजता सुटणार आहे.