Eknath Shinde: वक्त वक्त की बात है, एक एक आमदार शोधून सरकार बनवणारे शिंदे ते पक्षच हायजॅक करणारे शिंदे, पहा व्हिडीओ
2019 मध्ये जेंव्हा अशीच स्थिती उद्भवली होती. त्यावेळी शिंदे यांनी आमदार आणले होते. मात्र यावेळी तेच आमदार घेऊन पसार झाले. मग शिंदे कोण असावाल विचारला जात आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या दोन शिवसेना (shivshena) अवतरल्याचे चित्र आहे. त्यामुळे सामान्य जनतेलाच नक्की कोणती शिवसेना खरी आणि कोणती खोटी असा सवाल पडला आहे. कारण हिंदुत्वाच्या मुद्यावरून आजपर्यंत शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav thackeray) यांना मनसे आणि भाजपकडून सुनावले जात होते. तर शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केल्याची ओरड होत होती. पण त्यामुळे शिवसेनेत कोणताच फरक पडत नव्हता. मात्र याचं मुद्यावरून शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी घेरले. तसेच शिवसेनेने या महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं आणि भाजपबरोबर युती करावी. आपलं हिंदुत्व जपावं म्हणत शिंदेंनी बंड पुकारले. त्यांच्या या बंडात सध्या शिवसेनेचे 33 आणि प्रहार संघटनेचे 2 असे 35 आमदार असल्याचे बोलले जात आहे. याच दरम्यान शिंदे यांच्यासह शिवसेनेवर प्रेम करणारे अनेक शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील जनता नाखुश दिसत आहे. तर ही 2019 मध्ये जेंव्हा अशीच स्थिती उद्भवली होती. त्यावेळी शिंदे यांनी आमदार आणले होते. मात्र यावेळी तेच आमदार घेऊन पसार झाले. मग शिंदे कोण असावाल विचारला जात आहे.
त्या आमदारांना विधानभवनात आणले
2019 मध्ये राज्यातील सत्ता भाजपच्या हातातून गेल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या जिव्हाळी लागले होते. तर त्यावेळी सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह हात मिळवनी करत पहाटेचा शपथ विधी घडवून आणला होता. तर राज्याची सत्ता 72 तासांसाठी आपल्या हातात घेतली होती. मात्र विश्वास ठरावात ते सरकार जाणार यामुळे फडणवीस यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यावेळी अजित पवार यांच्यासह काही आमदार फुटले होते. ज्यांना शोधण्यासह त्यांना परत महाविकास आघाडी सरकारमध्ये आणण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यांनीच त्यावेळी त्या आमदारांना विधानभवनात आणले होते.
35 आमदार घेऊन उडण छु
दरम्यान या विषयाला आता तीन ते चार वर्षांचा कालावधी पार पडला असतानाच अशीच स्थिती बनली आहे. मात्र यावेळी सारथी बनलेले शिंदे हेच धुर्त खेळ खेळून गेले आहेत. 2022 मध्ये शिंदे यांच्यामुळेच बनलेली महाविकास आघाडी सरकार आता पडण्याच्या स्थितीत आले आहे. 2019 मध्ये आमदार घेऊन येणारे शिंदे हे 2022 मध्ये शिवसेनेचे 33 आणि प्रहार संघटनेचे 2 असे 35 आमदार घेऊन उडण छु झाले आहेत. ते मुंबई गोवाहटी व्हाया सुरत गेले आहेत. तर त्यांच्या मागे ऑपरेशन कमळची ऊर्जा असल्याचेही बोलले जात आहे. ज्यामुळे 2019 मध्ये शिंदे यांचे स्वागत करणारी जनता आज 2022 मध्ये त्यांच्या निषेधाच्या घोषणा देत आहे.