Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरे यांच्याशी का लावलं जातंय कनेक्शन?

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरे यांच्याशी का लावलं जातंय कनेक्शन?

| Updated on: Dec 07, 2023 | 1:34 PM

दिशा सालियान मृत्यू प्रकरणी शिंदे सरकार आदित्य ठाकरे यांची SIT चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. पण दिशा सालियान प्रकरणाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होतेय ते दिशा सालियान प्रकरण नेमकं आहे तरी काय? आदित्य ठाकरे यांच या प्रकऱणाशी का लावलं जातंय कनेक्शन ? जाणून घ्या...

मुंबई, ७ डिसेंबर २०२३ : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी शिंदे सरकार आदित्य ठाकरे यांची SIT चौकशी करणार असल्याचे सांगितले जात आहे. यासह अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात हे SIT पथक हे काम करणार असल्याचीही सुत्रांची मागणी आहे. पण दिशा सालियान प्रकरणाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होतेय ते दिशा सालियान प्रकरण नेमकं आहे तरी काय? आदित्य ठाकरे यांच या प्रकऱणाशी का लावलं जातंय कनेक्शन ? जाणून घ्या… दिशा सालियान ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. तर सुशांतसिंह राजपूत वांद्रा येथे तर दिशा सालियान मालाडमध्ये राहायची. ८ जून २०२० ला दिशा सालियनचा इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्याच्या ६ दिवसांनी सुशांतसिंह राजपूतचाही मृत्यू झाला. तर राहुल शेवाळे यांनी असा दावा केला होता की, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले होते. तर बिहार पोलिसांच्या मते एयूचा अर्थ आदित्य आणि उद्धव ठाकरे असा आहे.

Published on: Dec 07, 2023 01:34 PM