राष्ट्रवादी कुणाची? लवकरच फैसला, मात्र शरद पवार गट आयोगाला करणार ‘हा’ सवाल
VIDEO | येत्या ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला होणार आहे. या होणाऱ्या सुनावणीकरता अजित पवार गट आणि शरद पवार असे दोन्ही गट तयार, मात्र शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीदरम्यान विचारला जाणार प्रतिसवाल, पक्षात फूट नाही मग...
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ | शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर निवडणूक आयोगाचे अधिकार क्षेत्र किती? असा प्रतिसवाल पवार गट आयोगाला करणार आहे. दरम्यान, येत्या ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला करण्यात येणार आहे. या होणाऱ्या सुनावणीकरता अजित पवार गट आणि शरद पवार अशा दोन्ही गटाकडून तयारी करण्यात येत आहे. अशातच शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर सवाल उपस्थित करण्यात आलाय. हाच प्रश्न शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या सुनावणीदरम्यान उपस्थित केला जाणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट नाही असं वारंवार शरद पवार यांच्याकडून सांगितले जात आहे. असे असतानाही निवडणूक आयोगापुढे सुनावणी का? असा प्रश्न कायम आहे आणि हाच प्रश्न शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगापुढे उपस्थित करणार आहे.