AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात बत्ती गुल होण्याचं कारण काय? उत्तर इथं मिळेल!

| Updated on: Feb 09, 2022 | 10:12 AM

दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. पिंपरीत तर पाणी पुरवठ्यावरही (Water Supply) परिणाम जाणवणार असून आता नेमकी वीज येणार कधी? असा प्रश्ना पुणे आणि पिंपरीतील लोकांना पडलाय.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये (No Eletricity in Pune & Pimpari Chinchwad) सकाळपासूनच लोकांचे वीज पुरवठा खंडीत झाल्यानं हाल झालेत. महापारेषणच्या लोणीकंद आणि चाकण या दोन्ही महत्वाच्या 400 केव्ही (400 KV) अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रांना वीज पुरवठा करणाऱ्या टॉवर लाईनमध्ये 5 ठिकाणी ट्रिपिंग (Triping) झालाय. पहाटे साडे चारच्या सुमारास बिघाड होण्याचं कारण होतं लाईनमध्ये ट्रिपिंग होणं. या ट्रिपिंगमुळे कोथरूड, शिवाजीनगरचा काही भाग वगळता पुणे शहर, पिंपरी आणि चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात विजेचा खेळखंडोबा झाला. सकाळी 6 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहितीही समोर आली आहे. दरम्यान, वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. पिंपरीत तर पाणी पुरवठ्यावरही (Water Supply) परिणाम जाणवणार असून आता नेमकी वीज येणार कधी? असा प्रश्ना पुणे आणि पिंपरीतील लोकांना पडलाय.

Published on: Feb 09, 2022 09:57 AM