आता जे होईल ते होईल- अब्दुल सत्तार

| Updated on: Aug 09, 2022 | 10:26 AM

त्यामुळे त्यांना मंत्रिपदही मिळणार की नाही इथपर्यंत चर्चा येऊन पोहचली असताना आता (Deputy Director of Education) शिक्षण उपसंचालकाच्या खुलास्याचे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात (TET Exam) टीईटीमधील घोटाळ्यात (Abdul Sattar) आ. अब्दुल सत्तार यांचेही नाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरुन सत्तार हे सोमवारी दिवसभर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले होते. शिवाय विरोधकांनीही त्यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे त्यांना मंत्रिपदही मिळणार की नाही इथपर्यंत चर्चा येऊन पोहचली असताना आता (Deputy Director of Education) शिक्षण उपसंचालकाच्या खुलास्याचे पत्र सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींनी टीईटी प्रमाणपत्राच्या आधारे कुठलाही लाभ घेतला नसल्याचे हे पत्र आहे. हिना कैसर अब्दुल सत्तार आणि उजमा नहीद अब्दुल सत्तार यांनी कुठलेही लाभ घेतले नसल्याचे उपसंचालक अनिल साबळे यांनी या पत्रात म्हटलेले आहे. दरम्यान या संदर्भात अब्दुल सत्तार काय म्हणालेत बघुयात…

 

 

Published on: Aug 09, 2022 10:26 AM
Maharashtra Cabinet Expansion : ‘मंत्रीपद हा आमचा हक्क आणि तो आम्ही मिळवणारच’, बच्चू कडूंची गर्जना
थोड्याच वेळात शपथविधी!