राष्ट्रवादीला मोठं खिंडार, गोंदियात नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचाही शिंदे गटात प्रवेश

राष्ट्रवादीला मोठं खिंडार, गोंदियात नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचाही शिंदे गटात प्रवेश

| Updated on: May 26, 2023 | 3:18 PM

VIDEO | गोंदियातील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उचललं शिवसेनेचं धनुष्य

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी राष्ट्रवादीचे गोंदियातील दोन नगराध्यक्ष, 15 नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दीघे यांच्या नावाने जयघोष केला. या पक्षप्रवेशामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या गोंदियातील नगराध्यक्षासह 15 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिंदे गटाची गोंदियातील ताकद वाढली आहे. तर राष्ट्रवादीला गोंदियात मोठा फटका बसला आहे. आगामी महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांना भगवा शेला खांद्यावर पांघरून त्यांचं शिंदे गटात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: May 26, 2023 03:15 PM