मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांसाठी कोणत्या सुविधा असणार? मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले…
VIDEO | सार्वजनिक बांधकाम विभगातर्फे मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा केंद्र तर चांगल्या सोयी आणि यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आश्वासन
पनवेल, १२ सप्टेंबर २०२३ | सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा केंद्र उभारण्यात आलेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सुविधा केंद्र आणि चहापान कक्षाचा शुभारंभ, प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी प्रथमोपचार केंद्र, टॉयलेट, पोलीस केंद्र, मोठे पार्किंग स्लॉट आणि मोफत चहापानाची सोय करण्यात येणार आहे. पनवेलकडून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक १५ किलोमीटर नंतर एक सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. नागरिकांसाठी सरकारमार्फत अत्यंत महत्त्वपूर्ण योजनांचे शुभारंभ करण्यात येणार आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर दर पंधरा किलोमीटरनंतर नागरी सुविधा केंद्र, मोठे पार्किंग स्लॉटसह सर्व वाहन चालकांसाठी चहापानाची मोफत व्यवस्था आणि प्रवास सुखकर करण्याचा मानस असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.