Ambadas Danve on Kale | 'कोण हा गजानन काळे?', अंबादास दानवे यांचा पलटवार

Ambadas Danve on Kale | ‘कोण हा गजानन काळे?’, अंबादास दानवे यांचा पलटवार

| Updated on: Aug 24, 2022 | 3:53 PM

Ambadas Danve on Kale | कोण हा गजानन काळे? असा पलटवार करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्या मुद्यातील हवाच काढून टाकली.

Ambadas Danve on Kale | कोण हा गजानन काळे? असा पलटवार करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांच्या मुद्यातील हवाच काढून टाकली. तर दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी 50 लाख काय 50 रुपये जरी घेतले असतील तर आपण तात्काळ राजीनामा देऊ असे वक्तव्य केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना विधान परिषदेतील (Legislative Council) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांनी पैसे घेतले नसतील तर त्यांना 50 खोके एकदम ओके ही घोषणा जिव्हारी लागण्याचे कारण नसल्याचे सांगितले. तसेच आज राज्यातील गावागावातील लहान मुलांनाही फुटलेल्या आमदारांनी पैसा घेतल्याचे माहिती असल्याचे सांगितले. पावसाळी अधिवेशनात विरोधक विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देऊन सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आज या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधील काही आमदारांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की ही झाली.