Hathras Stampede :  सत्संगात चेंगराचेंगरी अन् 100 हून अधिकांचा बळी, निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?

Hathras Stampede : सत्संगात चेंगराचेंगरी अन् 100 हून अधिकांचा बळी, निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?

| Updated on: Jul 03, 2024 | 2:18 PM

भोले बाबांनी कासगंज जिल्ह्यातील पटियाला येथील एका छोट्या घरातून सत्संगची सुरुवात केली होती. आता या भोले बाबांचा प्रभाव हा पश्चिम युपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत आहे. भोले बाबा कधी एकेकाळी पोलीस खात्यात नोकरी करायचे. आता ते स्वत:ला परात्माचा चौकीदार?

भोलेबाबाचं याआधी अनेकदा विविध वादांमध्ये नाव समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा १७ वर्ष पोलीस खात्यातील नोकरीत होते. नंतर व्हीआरएस घेवून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. तर कोरोना काळात त्यांना ५० अनुयायी जमवण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ५० हजारांहून जास्त लोकं जमल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. भोलेबाबाचं मूळ नाव सूरज पाल आहे. भोले बाबांनी कासगंज जिल्ह्यातील पटियाला येथील एका छोट्या घरातून सत्संगची सुरुवात केली होती. आता या भोले बाबांचा प्रभाव हा पश्चिम युपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशपर्यंत आहे. भोले बाबा कधी एकेकाळी पोलीस खात्यात नोकरी करायचे. आता ते स्वत:ला परात्माचा चौकीदार असल्याचं सांगतात. तर त्यांच्या असंख्य भक्तांचं म्हणणं आहे की, भोले बाबा हे देवाचे अवतारच आहेत. पण हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्पापांच्या मृत्यूला हाच बाबा जबाबदार असल्याची चर्चा होतेय.

Published on: Jul 03, 2024 02:18 PM