भाजपच्या टार्गेटवर नेमकं आहे तरी कोण-कोण? चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 'त्या' वक्तव्यानं सवाल उपस्थित

भाजपच्या टार्गेटवर नेमकं आहे तरी कोण-कोण? चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यानं सवाल उपस्थित

| Updated on: Aug 25, 2023 | 11:30 PM

VIDEO | भाजपच्या टार्गेटवर विरोधी पक्ष आहेतच पण आता भाजपचा आपल्या मित्र पक्षांनाच इशारा? काय केलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य, बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई, २५ ऑगस्ट २०२३ | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमरावती मतदारसंघ भाजपचाच असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे सध्या भाजप सोबत असलेल्या नवनीत राणा कमळाच्या चिन्हावर लढणार का? तर सध्या भाजप सोबत असलेल्या बच्चू कडू यांची बावनकुळे यांच्या एका वक्तव्यामुळे अडचण केली. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असे सांगत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे इशारा देऊ पाहताय का? असाही सवाल उपस्थित होतोय. भाजपच्या टार्गेटवर विरोधी पक्ष आहेतच पण आता भाजप आपल्या मित्र पक्षांनाच इशारा देतोय का? असा प्रश्न निर्माण केला जातोय. याचं कारण म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली काही वक्तव्य… ‘एकनाथ शिंदे यांना आम्ही सोबत आणलं नाही तर एकनाथ शिंदे हे हिंदुत्वासाठी आमच्यासोबत आलेत, २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणार आहेत असं आमच्या नेतृत्वानं स्पष्ट केलं आहे आणि मीही स्पष्ट केलंय. २०२४ नंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आणि अजित पवार केवळ राजकीय युती म्हणूनच भाजपासोबत आलेत.’, बघा नेमकं काय काय म्हणाले बावनकुळे

Published on: Aug 25, 2023 11:30 PM