Shivsena : खरी शिवसेना कोणाची? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरेंची ‘या’ 51 जागांवर जनतेचा फैसला
एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात महाराष्ट्रात ५१ जागांवर लढत झाली आहे. मतदारांनी आपला कौल दिलाय मात्र या ५१ जागा फक्त सरकारचंच नव्हे तर खरी शिवसेना कोणाची याचाही निर्णय देणार आहेत.
खरी शिवसेना कोणाची? कोण पात्र आणि कोण अपात्र? याचा फैसला सुप्रिम कोर्टात अद्याप प्रलंबित असला तरी खरी शिवसेना कोणाची याचा फैसला येत्या २३ तारखेला जनतेतून होणार आहे. महाराष्ट्रातील ५१ विधानसभा मतदारसंघातील नागरिक खरी शिवसेना कोणाची याचा फैसला देणार आहेत. कारण या ५१ जागांवर शिवसेना विरूद्ध शिवसेना अर्थात एकनाथ शिंदेंचे उमेदवार विरोधात उद्धव ठाकरेंचे उमेदवार अशी लढत आहे. दरम्यान, मुंबईतील ३६ जागांपैकी ११ जागांवर सेना विरूद्ध सेना असा सामना आहे. मागाठाणे मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेकडून उदेश पाटेकर यांच्यात सामना रंगतोय. तर भांडूप पश्चिममधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अशोक पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेकडून रमेश कोरगावकर, जोगेश्वरी पूर्व येथून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मनीषा वायकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेकडून अनंतर नर, दिंडोशीमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संजय निरूपम यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेकडून सुनिल प्रभू, माहिममधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवेसेनेकडून महेश सावंत यांच्यात विधानसभेची लढत आहे. तर आणखी कोणत्या मतदारसंघात कोणा-कोणात विधानसभेचा सामना रंगलाय बघा स्पेशल रिपोर्ट…