Sanjay Raut : 'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?

Sanjay Raut : ‘जिसका EVM उसकी…’, संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?

| Updated on: Nov 28, 2024 | 5:57 PM

महायुतीला सर्वाधिक 230 जागांवर यश मिळवता आलं आहे. तर महाविकास आघाडीला मात्र 49 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मात्र यंदाचा विधानसभेचा निकाल हा धक्कादायक असल्याचे म्हणत महाविकास आघाडीने या निकालावर आक्षेप घेतला आहे. ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचं विरोधी पक्षातील नेत्यांनी ठरवलंय.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये महायुतीला सर्वाधिक 230 जागांवर यश मिळवता आलं आहे. तर महाविकास आघाडीला मात्र 49 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मात्र यंदाचा विधानसभेचा निकाल हा धक्कादायक असल्याचे म्हणत महाविकास आघाडीने या निकालावर आक्षेप घेतला आहे. ईव्हीएम विरोधात कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्याचं विरोधी पक्षातील नेत्यांनी ठरवलंय. कायदेशीर लढाई लढण्यासाठीदेखील महाविकास आघाडीने मैदानात उतरली आहे. तर ईव्हीएम विरोधात आता मागे हटायचं नाही. कायदेशीर लढाई लढायची असा निर्णय शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. अशातच जनमत चोरणाऱ्यांना देश आणि जनता माफ करणार नाही, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये हिंदी भाषेत त्यांनी मोजक्या शब्दात ईव्हीएमवर भाष्य केले आहे. ‘जनमत चूरानेवालेको देश और जनता कभी माफ नहीं करेगी’, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे तर देखते रहो; आगे क्या क्या होता है! जय हिंद! असंही म्हटलं आहे. यासोबत एक फोटो तयार करून ज्यामध्ये जिसका ईव्हीएम उसकी डेमोक्रेसी असंही म्हटलं आहे.

Published on: Nov 28, 2024 05:56 PM