Uttar Pradesh मध्ये Congress चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? Priyanka Gandhi म्हणाल्या…
युपीच्या (UP) राजकारणात रोज नवे राजकीय बॉम्ब फुटत असल्याचे आपण पाहतोय, त्यामध्ये भाजपच्या (BJP) आमदारांचं बंड, समाजवादी पक्षाच्या नेत्यांचं भाजप प्रवेश अशा अनेक गोष्टींनी युपीतलं राजकारण तापलं आहे.
युपीच्या (UP) राजकारणात रोज नवे राजकीय बॉम्ब फुटत असल्याचे आपण पाहतोय, त्यामध्ये भाजपच्या (BJP) आमदारांचं बंड, समाजवादी पक्षाच्या नेत्यांचं भाजप प्रवेश अशा अनेक गोष्टींनी युपीतलं राजकारण तापलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा (PRIYANKA GANDI VADRA) यांनी शनिवारी सकाळी एक राजकीय बॉम्ब फोडला असून त्याची देशात चर्चा सुरू आहे. काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असं विचारल्यानंतर त्यांनी मीच तर सगळीकडे दिसतेय ! असं वक्तव्य केल्यानं राजकारणाची चर्चा संपुर्ण देशभर सुरू आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी युपीच्या तरूणांसाठी रोजगार निर्मिती योजनांची रूपरेषा देणारा जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. प्रत्येक पक्षाकडून निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन लोकांना आश्वासने दिली आहेत. पण तिथं अधिक चुरस वाढल्याने नेमकं विजय कोणाचा होईल याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. तिथल्या कार्यक्रमात त्यांना एक प्रश्न विचारण्यात त्यांचं उत्तर देताना त्या सगळीकडे मीच तर दिसतेय ! असं म्हणाल्या आहेत.