Special Report | महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण का वाढले? कारण आले समोर | Corona Update
थर्टी फर्स्टला राज्यातली रुग्णांची संख्या 8067 इतकी झाली. त्यापैकी एकट्या मुंबईतच 5428 नवे रुग्ण आढळले. त्यामुळंच मुंबईतील बंद केलेले कोव्हिड सेंटर सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोविड सेंटर सुरु करण्यासोबतत लहान मुलांसाठीचं लसीकरणासाठीही सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई : 28 डिसेंबरला राज्यात 2 हजार 172 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यावेळी मुंबईत 1233 रुग्ण आढळले. 29 डिसेंबरला राज्याचा आकडा वाढला, 3900 नवे रुग्ण आढळले. तर मुंबईत 2510 नव्या रुग्णांची नोंद झाली. 30 डिसेंबरला महाराष्ट्रात कोरोनाचे 5368 रुग्ण वाढले. त्यापैकी मुंबईतच 3928 रुग्ण होते पुन्हा 31 डिसेंबरला रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला. थर्टी फर्स्टला राज्यातली रुग्णांची संख्या 8067 इतकी झाली. त्यापैकी एकट्या मुंबईतच 5428 नवे रुग्ण आढळले. त्यामुळंच मुंबईतील बंद केलेले कोव्हिड सेंटर सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोविड सेंटर सुरु करण्यासोबतत लहान मुलांसाठीचं लसीकरणासाठीही सुरुवात करत असल्याची माहिती दिली आहे.
Latest Videos