MPSC विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ का आली? काँग्रेसच नेत्यांचा सरकारला सवाल
VIDEO | MPSC विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ का आली?; आयोगानं विचार करण्याची गरज, काँग्रेसच नेत्यांनं उपस्थित केला सवाल
पुणे : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. कालपासून हे विद्यार्थी आंदोलन करत आहेत. पुण्यातील बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय. अशातच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे MPSC विद्यार्थ्यांवर आंदोलनावर भाष्य केले आहे. महाराष्ट्रात अशी गंभीर परिस्थिती का निर्माण झाली. राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री हे विद्यार्थ्यांना आश्वासन देऊनही विद्यार्थी आंदोलन का करताय? याबाबत आयोगाने पण सकारात्मक विचार करायला हवा? आयोगाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र असताना सकारात्मकपणे आयोगाकडून निर्णय घेतला जात नसल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.