तेजस ठाकरे दसरा मेळाव्यातून राजकारणात एन्ट्री करणार?, पोस्टर व्हायरल
शिवसेनेच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे हे देखील राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. येत्या दसरा मेळाव्यातून तेजस ठाकरे हे राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : शिवसेनेच्या (Shiv Sena) गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे देखील राजकारणात एन्ट्री करण्याची शक्यता आहे. येत्या दसरा मेळाव्यातून तेजस ठाकरे हे राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. तेजस ठाकरे यांना पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक महत्त्वाचे नेते हे शिंदे गटात सामील झाले आहेत. ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न सध्या शिवसेनेकडून सुरू आहे. पक्षातील अनेक महत्त्वांच्या पदांवर शिवसेनेकडून नव्या नेत्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता तेजस ठाकरे हे सक्रिय राजकारण सहभागी होण्याची शक्यता आहे. तेजस ठाकरे यांना युवासेनाप्रमुखपदाची जाबाबदारी मिळणार असल्याची चर्चा देखील सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र शिवसेनेच्या वतीने कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया याबाबत अद्याप देण्यात आलेली नाहीये.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

