Video | नाटकाच्या प्रयोगादरम्यान लांडग्यांचा हल्ला, कलाकार भांबावले, व्हिडीओ व्हायरल

चिनमध्ये शिआन शहरात तर नाटकाचा प्रयोग सुरु असताना एक गंभीर घटना घडली आहे. येथे नाटकाच्या प्रयोगादरम्यान स्टेज तसेच प्रेक्षागृहात चक्क लांडग्यांनी धुमाकूळ घातला आहे. लांडग्यांच्या या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | नाटकाच्या प्रयोगादरम्यान लांडग्यांचा हल्ला, कलाकार भांबावले, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 9:55 PM

शिआन : चित्रपट आणि नाटकाचे भरतातच नव्हे तर संपूर्ण जगात चाहते आहेत. काही लोक चित्रपटापेक्षा प्रत्यक्षपणे नाटक पाहणे पसंद करतात. याच कारणामुळे नाट्यगृहांची शान आणि त्यांचा मान अजूनही आहे तसाच आहे. मात्र, नाटक करणे वाटते तेवढे सोपे नसते. प्रत्यक्ष अभिनय करताना नटाला एकाच वेळी अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. चिनमध्ये शिआन शहरात तर नाटकाचा प्रयोग सुरु असताना एक गंभीर घटना घडली आहे. येथे नाटकाच्या प्रयोगादरम्यान स्टेज तसेच प्रेक्षागृहात चक्क लांडग्यांनी धुमाकूळ घातला आहे. लांडग्यांच्या या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Wolves chased actors while performing live on stage in Xian China video goes viral on social media)

चीनमध्ये नाट्यप्रयोग सुरु असताना लांडग्यांचा धुमाकूळ

मिळालेल्या माहितीनुसार चीनच्या शिआन (Xian) शहरात एका नाट्यगृहात ‘ट्यूलिंग लिजेंड’ नावाचा शो सुरु होता. मध्य आशियाच्या तांग राजवंश यांच्यावर आधारित हा शो होता. सुरु असलेल्या शोमध्ये लांडग्यांचेसुद्धा काम होते. एका अ‌ॅक्शन शोदरम्यान कलाकारांसोबत हे लांडगे अभिनय करत होते. मात्र, ऐन वेळी तब्बल 30 लांडग्यांनी स्टेजवर येऊन धुमाकूळ घातला.

सगळीकडे एकच धांदल

लांडग्यांनी थेट स्टेजवर येत चालू नाटकादरम्यान गर्दी केली. या लांडग्यांनी कलाकारांचा पाठलागही केला. एवढेच नाही तर हे लांडगे प्रेक्षकांच्या जागेजवळ आल्यामुळे सगळीकडे एकच धांदल उडाली. या व्हिडीओमध्ये एक कलाकार पडल्याचेसुद्धा आपल्याला दिसतेय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लांडग्यांनी केलेला हा हल्ला विविध समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. तसेच लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक आणि शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video | नव्या जोडीवर पैशांचा पाऊस, दिलदार मित्रांचा व्हिडीओ एकदा पाहाच

Video | वर्ल्ड रेकॉर्डसाठी सुरु होता सराव, खतरनाक स्टंट करताना मृत्यू, व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ

Video | प्रेमाने जवळ गेली अन् मध्येच झाला घोळ, उंदीर ड्रेसमध्ये घुसल्यामुळे पंचाईत, महिलेचा व्हिडीओ व्हायरल

(Wolves chased actors while performing live on stage in Xian China video goes viral on social media)

वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....