हातात तलवार अन् चेहऱ्यावर रूबाब… मालवणच्या ‘राजकोट’वरचा शिवरायांचा नवा पुतळा कसा असणार? कधी होणार अनावरण?
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी ७०० घनमीटर एम ५० काँक्रीट, शिवरायांच्या या पुतळ्यासाठी अंदाजे ४० टन ब्राँझचा वापर आणि ३५ टन स्टील फ्रेम वर्क करण्यात आलंय. यासह ३० टन एसएस आणि ३१६ दर्जाचे स्टेनलेस स्टील सळ्यांचा वापर करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा उभारण्याचं काम पूर्णत्वाच्या जवळ आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं १ मे रोजी अनावरण करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारताना डूप्लेक्स स्टीलचे फ्रेमवर्क वापरण्यात आल्याची माहिती मिळतेय. जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी शिवरायांचा नवा पुतळा साकारला आहे. तर नव्या पुतळ्याचे आयुर्मान १०० वर्ष असून कोणत्याही नैसर्गिक वादळांना तोंड देईल असे सांगितले जात आहे. तर पुतळा उभारणीच्या कामासाठी जवळपास ३२ कोटी रूपये खर्च आला असल्याची माहिती आहे. यासह मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा योद्धा रूपात शिवरायांचा पुतळा असणार आहे. चबुतरा, तलवारीसह पुतळ्याची उंची ८३ फूट तर प्रत्यक्ष पुतळ्याची उंची ही ६० फूट इतकी असणार आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
