गुणरत्न सदावर्ते अडचणीत? एसटी बँकेतील कारभाराचा मुद्दा सभागृहात, आरोपांना उत्तर देताना सदावर्ते थेट हिंदुत्वावर

| Updated on: Dec 12, 2023 | 10:30 AM

एसटी बँकेच्या कारभाराचा मुद्दा हिवाळी अधिवेशनातील सभागृहात उपस्थित झाला. सरकारनेही विरोधकांच्या आरोपांची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. कालपर्यंत सदावर्ते सत्तेत असलेल्या नेत्यांवर आरोप करत होते, त्याच सदावर्तेंच्या सत्तेतील एसटी बँकेच्या कारभाराची आता चौकशी होणार

मुंबई, १२ डिसेंबर २०२३ : एसटी बँकेच्या कारभाराचा मुद्दा हिवाळी अधिवेशनातील सभागृहात उपस्थित झाला. सरकारनेही विरोधकांच्या आरोपांची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. कालपर्यंत सदावर्ते सत्तेत असलेल्या नेत्यांवर आरोप करत होते, त्याच सदावर्तेंच्या सत्तेतील एसटी बँकेच्या कारभाराची आता चौकशी होणार आहे. वर्षभरापुर्वी जे सदावर्ते अनिल परब यांच्या चौकशीची मागणी करत होते. आज त्याच सदावर्तेंच्या एसटी बँकेच्या कारभारामागे चौकशी लागण्याची वेळ आली आहे. ठेवींवर जेवढं व्याज आहे, त्याहून कमी दराने कर्ज देणं, सदावर्ते यांनी स्वतःच्या अनुनभवी २३ वर्षांच्या मेहुण्याला बँक व्यवस्थापक म्हणून नेमणं, तज्ञ संचालक म्हणून स्वतः सदावर्ते, त्यांची पत्नी जयश्री पाटलांची नियुक्ती, स्वतः आरबीआयनं एसटी बँकेतील ठरावांबाबत चिंता व्यक्त करणे आणि सदावर्तेंच्या पॅनलचे १९ पैकी १४ संचालक नॉट रिचेबल असणं, यामुळे सदावर्ते यांची एसटी बँकेतील सत्ता अडचणीत आली आहे. सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. बघा गुणरत्न सदावर्ते यांनी कसं दिलं प्रत्युत्तर

Published on: Dec 12, 2023 10:30 AM
माझा जीव धरणीला टेकला तरी…, प्रकृती अत्यंत खालावली असताना जरांगे पाटलांचा निर्धार कायम
Disha Salian : आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी सरकारचा प्रयत्न? आजच SIT ची स्थापना होणार?