World Cup 2023 Final न भूतो न भविष्यति... आकाशात आतषबाजी; एअर शोने दिपले डोळे

World Cup 2023 Final न भूतो न भविष्यति… आकाशात आतषबाजी; एअर शोने दिपले डोळे

| Updated on: Nov 19, 2023 | 2:57 PM

भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमकडून हा एअर शो सादर करण्यात आला. या एरोबॅटिक टीमने स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना 10 मिनिटे मंत्रमुग्ध केल्याचे पाहायला मिळाले. World Cup 2023 Final सामन्यापूर्वी हवाई दलाचा एअर शो सादर झाला तर आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असा क्षण पाहायला मिळाला

World Cup Final 2023 Air Show १९ नोव्हेंबर २०२३ : वनडे वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात होतोय. हा थरारक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या अंतिम सामन्याची चाहत्यांमध्ये उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नाणेफेकीनंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आकाशात एक शानदार एअर शो पाहायला मिळाला. यावेळी न भूतो न भविष्यति… अशी आकाशात आतषबाजी पाहायला मिळालीय सामन्यापूर्वी झालेल्या एअर शोने उपस्थितांचे डोळे दिपले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमकडून हा एअर शो सादर करण्यात आला. या एरोबॅटिक टीमने स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना 10 मिनिटे मंत्रमुग्ध केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Nov 19, 2023 02:56 PM