World Sparrow Day | चिमण्यांच्या संगोपनासाठी ‘त्यानं’ घरातच बांधली ७० घरटी
VIDEO | जागतिक चिमणी दिवस... जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कन्हाळा बुद्रुक येथील ठाणसिंग माणिक पाटील या तरूणाने चिमणी संगोपनाचा अनोखा संकल्प
जळगाव : आज जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात येत आहे. चिमणी संवर्धनासाठी जागर करण्याचा दिवस म्हणून जागतिक चिमणी दिवसाकडे पाहिले जाते. दरम्यान, सर्वत्र चिमण्यांची संख्या घटत असल्याची ओरड होत असताना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कन्हाळा बुद्रुक येथील ठाणसिंग माणिक पाटील या तरूणाने चिमणी संगोपनाचा अनोखा संकल्प केला आहे. स्वतःचे घर आणि गोठ्यात त्यांनी चिमण्यांसाठी तब्बल ७० घरटी बांधली आहेत. गेल्या तीन वर्षात दोन ते तीन चिमण्यांची असलेली संख्या यंदा दीडशेच्या घरात पोहोचली आहे. आज जागतिक चिमण्यांचा दिवस या निमित्त साजरा केला. ठाणसिंग माणिक पाटील हे वर्षाकाठी एक क्विंटल धान्याची व्यवस्था या तब्बल दीडशे चिमण्यांसाठी करत असल्याचे सांगतात.
Published on: Mar 20, 2023 05:21 PM
Latest Videos