“राहुल गांधी यांनी मणिपूरमध्ये आग लावली,” स्मृती इराणी यांच्या आरोपावर काँग्रेस महिला आमदार भडकली; म्हणाली…
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मणिपूर प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आग लावल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी स्मृती इराणी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मुंबई, 27 जुलै 2023 | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मणिपूर प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आग लावल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तसेच संसदेत प्रश्नोत्तराच्या तासांत त्यांनी काँग्रेसवर तिखट शब्दात वार केले. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी स्मृती इराणी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “स्मृती इराणी या काल संसदेत नळावरच्या भांडण करतात तशा मुद्दे मांडत होत्या. मणिपूरमध्ये तुम्ही बेजबाबदारपणे वागलात आणि तुम्ही राहुल गांधींना काय बोलता? तुम्हाला तुमची चोरी लपवायची आहे म्हणून राहुल गांधींवर असे आरोप केले जात आहेत. स्मृती इराणी यांनी तर राजीनामा दिला पाहिजे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.”
Published on: Jul 27, 2023 02:19 PM
Latest Videos