ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं

| Updated on: Dec 19, 2021 | 1:12 PM

कार रिव्हर्स घेताना वाहन चालकाने बाळगलेली निष्काळजी रस्त्यावरील तरुणाला चांगलीच महागात पडली. ड्रायव्हरने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबल्यामुळे पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना ती वेगाने मागे आली आणि कारने एकाला चिरडलं.

नागपूर : कार रिव्हर्स घेताना वाहन चालकाने बाळगलेली निष्काळजी रस्त्यावरील तरुणाला चांगलीच महागात पडली. ड्रायव्हरने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबल्यामुळे पार्किंगमधून गाडी बाहेर काढताना ती जोरदार वेगाने मागे आली आणि कारने एकाला चिरडलं. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे, तर दोघे जण थोडक्यात बचावले. नागपुरात घडलेली ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात मुख्य रस्त्यावर ही घटना घडली आहे. मेन रोडच्या जवळच संबंधित चारचाकी गाडी पार्क करण्यात आली होती. ड्रायव्हर ती काढण्याचा प्रयत्न करत असताना हा भीषण अपघात झाला.

Eknath Khadse | प्रत्येक जण आपआपल्या कुवती प्रमाणं बोलतो, गुलाबरावांच्या वक्तव्यावरुन खडसेंचं उत्तर
पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; प्रवाशांचे हाल