Nagpur | पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नागपूरच्या पारडीतील घटना
नागपुरात पोलीसांच्या मारहाणीत तरुणाच्या मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. मद्यपी तरुणाची दुचाकी पोलीस वाहनावर धडकल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली. मनोज ठवकर असं या तकरुणाचं नाव आहे. मनोजची गाडी पोलीस वाहनावर धडकल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली, असा आरोप आहे.
नागपुरात पोलीसांच्या मारहाणीत तरुणाच्या मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. मद्यपी तरुणाची दुचाकी पोलीस वाहनावर धडकल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली. मनोज ठवकर असं या तकरुणाचं नाव आहे. मनोजची गाडी पोलीस वाहनावर धडकल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली, असा आरोप आहे. नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणाने रात्री उशीरापर्यंत परिसरात तणाव होता. भवानी हॅास्पीटलमध्ये मनोज ठवकरला मृत घोषित केलं. भवानी हॅास्पीटल परिसरात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत घोषणाबाजी केली. | youth dies after beaten by police in nagpur