चिमुकलीनं भरवला घास अन् रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

चिमुकलीनं भरवला घास अन् रोहित पवार यांचे अन्नत्याग आंदोलन मागे

| Updated on: Oct 27, 2023 | 1:15 PM

VIDEO | पारोडी फाटा येथे आमदार रोहित पवार यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ केलेलं अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. रोहित पवार यांनी काल दिवसभर केलेले अन्नत्याग आंदोलन स्थानिक नागरिकांच्या आग्रहास्तव मागे घेतले आहे.

पुणे, २७ ऑक्टोबर २०२३ | पारोडी फाटा येथे आमदार रोहित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ केलेलं अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. रोहित पवार यांनी स्थानिक महिला आणि नागरिकांच्या आग्रहास्तव काल दिवसभर केलेले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. काल दिवसभर काहाही न खाता रोहित पवार यांनी आपली युवा संघर्ष यात्रा अविरतपणे सुरू ठेवली होती. तर तब्बल १८ किमी पायी प्रवास करत त्यांनी आपल्या मुक्कामाचे ठिकाण गाठले होते. तर दिवसभर पायी पायपीट केल्यानंतर तोच उत्साह कायम ठेवत त्यांनी जनतेशी संवाद साधाला आणि रात्री उशिरा नागरिकांनी त्यांच्यासाठी घरून जेवण करून आणले होते. यावेळी नागरिकांच्या आग्रहास्तव त्यांनी अन्नग्रहण केले आणि अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. यावेळी लहानग्या चिमुकलीनं घास भरल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Oct 27, 2023 12:24 PM