Paid Menstrual Leave : ‘मासिक पाळी’च्या भर पगारी सुट्टीवर ‘झिम्मा 2’ चे कलाकार स्पष्टच म्हणाले…
राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य मनोज कुमार झा यांनी देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर सवाल केला असता ‘मासिक पाळी’ साठी भरपगारी सुट्टी देण्यावरून स्मृती इराणी यांनी हे मोठे विधान केल्याचे पाहायला मिळाले. या वक्तव्यावरून कुठं समर्थन होताना दिसतंय तर कुठं विरोध, झिम्मा २ च्या कलाकारांना काय वाटतंय?
मुंबई, १५ डिसेंबर २०२३ : ‘मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही, हा स्त्रियांच्या जीवन प्रवासाचा एक नैसर्गिक भाग आहे. त्यामुळे भरपगारी सुट्टीच्या कोणत्याही विशिष्ट धोरणाची हमी देऊ नये. तर या कारणासाठी स्त्रियांना समान संधी नाकारल्या जातात’, असं मोठं वक्तव्य केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत केलं. राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य मनोज कुमार झा यांनी देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर सवाल केला असता ‘मासिक पाळी’ साठी भरपगारी सुट्टी देण्यावरून स्मृती इराणी यांनी हे मोठे विधान केल्याचे पाहायला मिळाले. स्मृती इराणी यांनी राज्यसभेत केलेल्या या विधानाचं समाजातील काही महिलांनी स्वागत करत समर्थन केलं तर काही महिलांकडून या वक्तव्यावर विरोधही केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. यासंदर्भात अनेक हिंदी आणि मराठी सेलिब्रिटी देखील यावर व्यक्त होताना दिसत आहेत. अशातच टिव्ही ९ मराठीच्या ऑफिसमध्ये झिम्मा २ या चित्रपटाची टीम आली होती. त्यांनी देखील या विषयावर आपले मत मांडले, बघा काय म्हणाले, झिम्मा २ चे कलाकार?

कामरानं शिंदेंना गद्दार म्हटलं पण दादांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

कामराच्या त्या गाण्यावर शिंदें स्पष्टच म्हणाले, मी दुर्लक्ष केलं पण...

राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत

'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
