AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE | राज्यपालांकडून सत्तास्थापनेची विचारणा, भाजप कोअर कमिटीची बैठक

सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापन करण्याची आपल्या पक्षाची इच्छा आणि क्षमता आहे का? अशी विचारणा राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली होती.

LIVE | राज्यपालांकडून सत्तास्थापनेची विचारणा, भाजप कोअर कमिटीची बैठक
Follow us
| Updated on: Nov 10, 2019 | 2:37 PM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. हे निमंत्रण स्वीकारावं का, याबाबत चर्चेसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक (BJP Core Committee Meeting) आयोजित करण्यात आली आहे. बहुमताच्या अग्निपरीक्षेला भाजप सामोरं जाणार का, याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागली आहे.

[svt-event title=”चार वाजता पुन्हा बैठक” date=”10/11/2019,2:36PM” class=”svt-cd-green” ] राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाबाबत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा, चार वाजता पुन्हा चर्चा करणार, त्यानंतर जनतेसमोर भूमिका मांडणार, आमचा निर्णय राज्यपालांना कळवणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती [/svt-event]

सत्तासंघर्षामुळे राज्यपालांचा नियोजित नागपूर दौरा रद्द करण्यात आला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापन करण्याची आपल्या पक्षाची इच्छा आणि क्षमता आहे का? अशी विचारणा राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली होती. याबाबतचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती.

भाजप हा 105 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

राज्यपालांची फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्याबाबत विचारणा

शिवसेनेला आतापर्यंत 8 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 64 वर पोहचलं आहे. भाजपला 11 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 116 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं.

शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरुन संघर्ष सुरु झाला. त्यामुळे बहुमत सिद्ध करताना शिवसेना काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचं आहे.

फडणवीसांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. तो मंजूर करत राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास फडणवीस यांना सांगितलं. भाजप बहुमतापासून फार दूर असल्यामुळे राज्यपालांनी दिलेलं सत्तास्थापने आमंत्रण स्वीकारुन बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान भाजपसमोर असेल.

भाजपला पाठिंबा दिलेले आमदार

  1. महेश बालदी – उरण (रायगड)
  2. विनोद अग्रवाल – गोंदिया (गोंदिया)
  3. गीता जैन – मीरा भाईंदर (ठाणे) – (भाजप बंडखोर)
  4. किशोर जोरगेवार – चंद्रपूर (चंद्रपूर)
  5. रवी राणा – बडनेरा (अमरावती)
  6. राजेंद्र राऊत – बार्शी (सोलापूर)
  7. प्रकाश आवाडे – इचलकरंजी (कोल्हापूर) (काँग्रेस बंडखोर)
  8. संजय मामा शिंदे – करमाळा (सोलापूर) (राष्ट्रवादी बंडखोर)
  9. श्यामसुंदर शिंदे – <पक्ष – शेकाप> लोहा (नांदेड) – (भाजप बंडखोर)
  10. रत्नाकर गुट्टे – <पक्ष – रासप> – गंगाखेड (परभणी)
  11. विनय कोरे – <पक्ष – जनसुराज्य पक्ष> – शाहूवाडी (कोल्हापूर)

शिवसेनेला पाठिंबा दिलेले आमदार

  1. आशिष जयस्वाल – रामटेक (नागपूर)
  2. नरेंद्र भोंडेकर – भंडारा (भंडारा)
  3. चंद्रकांत पाटील – मुक्ताईनगर (जळगाव) – (शिवसेना बंडखोर)
  4. मंजुषा गावित – साक्री, धुळे (भाजप बंडखोर)
  5. राजेंद्र पाटील यड्रावकर – शिरोळ, कोल्हापूर (राष्ट्रवादी बंडखोर)
  6. बच्चू कडू – <पक्ष – प्रहार संघटना> – अचलपूर (अमरावती)
  7. राजकुमार पटेल – <पक्ष – प्रहार संघटना> – मेळघाट (अमरावती)
  8. शंकरराव गडाख – <पक्ष – क्रांतिकारी शेतकरी पक्ष> – नेवासा (अहमदनगर)

यांचा पाठिंबा कोणाला?

  1. मनसे – 01
  2. माकप – 01
  3. एमआयएम – 02

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

  • भाजप – 105
  • शिवसेना – 56
  • राष्ट्रवादी – 54
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03 (महाआघाडी)
  • प्रहार जनशक्ती – 02 (शिवसेनेला पाठिंबा)
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02 (महाआघाडी)
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01 (भाजपला पाठिंबा)
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 (शिवसेनेला पाठिंबा)
  • शेकाप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • रासप – 01 (भाजपला पाठिंबा)
  • स्वाभिमानी – 01 (महाआघाडी)
  • अपक्ष – 13 – (8 अपक्ष भाजपसोबत, 5 अपक्ष शिवसेनेसोबत)
  • एकूण – 288

BJP Core Committee Meeting

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.