राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देत पक्षप्रवेशाची ऑफर : एकनाथ खडसे

राष्ट्रवादीवाले माझ्याकडे एबी फॉर्म घेऊन आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे

राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देत पक्षप्रवेशाची ऑफर : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Oct 17, 2019 | 10:15 AM

जळगाव : राष्ट्रवादीने फक्त पक्षप्रवेशाची ऑफरच दिली नाही, तर थेट एबी फॉर्म घेऊनच भेटायला आले होते, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse on NCP offer) यांनी केला आहे. भुसावळमधील प्रचारसभेदरम्यान भाजपशी एकनिष्ठ असल्याचं सांगताना खडसे भावनिक झाले.

राष्ट्रवादीवाले माझ्याकडे एबी फॉर्म घेऊन आले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी वाट पाहिली. अखेर राष्ट्रवादीला शिवसेनेकडून उसनवार घेतलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. त्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला, पण त्याने अद्याप शिवसेना सोडली नाही, पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिलेला नाही, अशी टीकाही एकनाथ खडसे यांनी केली.

एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांना, जे पंतप्रधानपदावर दावा करतात, त्या शरद पवारांना मुक्ताईनगर मतदारसंघात एका अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला, एवढी दयनीय अवस्था शरद पवार यांची झाली असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.

माझ्यावर अन्याय झाला असून आजही मी पक्षाला तेच विचारतोय की मी काय गुन्हा केला आहे? ज्या पक्षाने मला मोठं केलं, मंत्रिपद दिलं, त्या मायेने एकाएकी मला सोडून दिलं. मात्र तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, असे भावनिक उद्गार एकनाथ खडसे (Eknath Khadse on NCP offer) यांनी भुसावळमधील प्रचार सभेदरम्यान काढले.

भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारासाठी एकनाथ खडसे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. पाच वर्ष संजय सावकारे नाथाभाऊ यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. जवळचे आमदार मात्र पळून गेले. आता नाथाभाऊच्या मागे गेलो, तर आपलंही तिकीट कापलं जाईल अशी भीती त्यांना होती. मात्र तिकीटवाटप माझ्याकडे होतं. मी महाराष्ट्राच्या पार्लमेंटरी बोर्डात असून तिकीटवाटप मला विश्वासात घेऊनच झालं, असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

माझ्या मुलीला पाडायला खुद्द पवार आले, माझीच प्रतिष्ठा वाढली : खडसे

स्मृतीजी, संसदेत येण्याच्या इच्छेमुळे हिंदीत भाषण करतो : खडसे

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.