राज्यपालांची फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्याबाबत विचारणा

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून तयार झालेला पेच काहीसा सुटत असल्याचं दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आपल्या बाजूने सरकार स्थापनेच्या (Governor invite Devendra Fadnavis) शक्यतांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

राज्यपालांची फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्याबाबत विचारणा
Follow us
| Updated on: Nov 09, 2019 | 8:36 PM

मुंबई: महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून तयार झालेला पेच काहीसा सुटत असल्याचं दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आपल्या बाजूने सरकार स्थापनेच्या (Governor invite Devendra Fadnavis) शक्यतांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे विधीमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी (Government Formation) आवश्यक बहुमत सिद्ध करण्याविषयी विचारणा केली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यपालांच्या विचारणेनंतर आता भाजप काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

आता भाजप बहुमत सिद्ध करणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह सत्तावाटपाच्या 50-50 फॉर्म्युल्यावर कोणतीही तडजोड होणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजप बहुमताची तजवीज कशी करणार हा प्रश्न आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या निमंत्रणावर उद्या (10  नोव्हेंबर) भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. भाजपकडे बहुमताचा आकडा नसताना अल्पमतातील सरकार स्थापन करण्याचा धोका भाजप स्वीकारणार का की मित्रपक्ष शिवसेनेच्या मागण्या मान्य करत त्यांना सोबत घेणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामध्ये भाजपाला 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. तसेच मनसेला एक जागा आणि अपक्षांना 28 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे आपली ताकद वाढवण्यासाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी अपक्षांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोर लावला होता. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपला 18 अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचं म्हणत आमचं संंख्याबळ 123 वर गेल्याचं सांगितलं. तसंच आम्हाला केवळ 22 आमदारांची आवश्यकता असल्याचंही म्हटलं.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 16 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावरुन भांडत आहेत. त्यातच शिवसेनेने आघाडीशी सलगी करत सत्ता स्थापनेचा पर्याय देखील खुला ठेवला आहे. त्यामुळे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेसचा ‘हात’ ठेवत राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या : 

भाजप नेते उद्या राज्यपालांना भेटणार, मुनगंटीवार ते केसरकर महायुतीचं सरकार : सुधीर मुनगंटीवार

काँग्रेस खासदार हुसैन दलवाई संजय राऊतांच्या भेटीला

पवारांच्या भूमिकेने सर्वांचीच अडचण, भाजप, शिवसेना आणि काँग्रेसही बुचकळ्यात, सत्ताचक्राच्या केंद्रस्थानी एकमेव शरद पवार!

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.