AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेला जबर धक्का, आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश (Nitin Nandgaonkar in Shivsena) केला. मनसेचे संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या नांदगावकरांच्या सेनाप्रवेशाने मनसेच्या गोटात खळबळ माजण्याची शक्यता आहे. ‘मातोश्री’ या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत जाहीर […]

मनसेला जबर धक्का, आक्रमक नेते नितीन नांदगावकर शिवसेनेत
Follow us
| Updated on: Oct 03, 2019 | 10:05 AM

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश (Nitin Nandgaonkar in Shivsena) केला. मनसेचे संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या नांदगावकरांच्या सेनाप्रवेशाने मनसेच्या गोटात खळबळ माजण्याची शक्यता आहे.

‘मातोश्री’ या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी वरुण सरदेसाईही उपस्थित होते. नितीन नांदगावकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मनसेने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. नितीन नांदगावकर यांना मुंबईतून उमेदवारी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र दुसऱ्या यादीतही वेटिंगवर राहिल्याने नांदगावकरांनी सेनेचा रस्ता धरल्याचं दिसत आहे.

नितीन नांदगावकर यांची नाराजी (Nitin Nandgaonkar in Shivsena) आतापर्यंत पाहायला मिळालेली नव्हती. त्यामुळे ते थेट शिवबंधन बांधताना दिसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कोण आहेत नितीन नांदगावकर?

परप्रांतीय रिक्षाचालकांकडून होणाऱ्या प्रवाशांच्या अडवणुकीविरोधात मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांच्याकडून नेहमी आक्षेप घेतला जायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून नांदगावकर हे पक्षात आहेत.

मनसेच्या ‘डॅशिंग’ नेत्या रुपाली पाटील उमेदवारी डावलल्याने आक्रमक

नांदगावकर हे आपल्या परप्रांतीयांविरोधातील भूमिकेसाठी ओळखले जातात. आपल्या फेसबुक पेजवर ते अनेकदा परप्रांतीयांविरोधातले व्हिडीओ शेअर करत असतात. पोलिसांनी नांदगावकरांना मुंबई, उपनगरं आणि पालघर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई केली होती.

मनसेचे 72 उमेदवार जाहीर

महाराष्ट्र विधानसभेसाठी राज ठाकरे यांच्या मनसेची दुसरी उमेदवार यादी काल जाहीर झाली आहे. दुसऱ्या यादीत 45 नावं आहेत. मनसेने आधी 27 जणांची यादी जाहीर केली होती. म्हणजे मनसेने आतापर्यंत एकूण 72 उमेदवार जाहीर केले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली. राज ठाकरे यांनी पाच ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं सांगितलं. किती उमेदवार लढणार हे लवकरच जाहीर करेन, रोज चार-पाच नावं जाहीर करेन, असं ते म्हणाले होते.

MNS Candidates list | मनसेची दुसरी उमेदवार यादी, 45 उमेदवार जाहीर

महत्त्वाचं म्हणजे मनसेचे आघाडीचे नेते बाळा नांदगावकर यांचं नाव या यादीतही नाही. त्यामुळे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यासारखे मनसेचे माजी आमदार निवडणूक लढवणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या :

समाजकंटकांना पोलिस ठोकणार की मी ठोकू? मनसे नेते नितीन नांदगावकरांचा सवाल

बटणाने टॅक्सीचं मीटर फास्ट, मनसे नेते नांदगावकरांचा दावा, टॅक्सी फोडण्याचाही इशारा

अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली.
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार
बारावीचा निकाल उद्या, राज्य शिक्षण मंडळ निकाल जाहीर करणार.
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा
संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये रंगल्या गप्पा.
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत
पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट बंद, ग्राहक चिंतेत.
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.