AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथगडावर राजकीय भूकंपाचे संकेत, पंकजा मुंडेंसह भाजपचे दोन नेते खदखद मांडणार?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर जाण्याची चिन्हं व्यक्त केली जात आहेत.

गोपीनाथगडावर राजकीय भूकंपाचे संकेत, पंकजा मुंडेंसह भाजपचे दोन नेते खदखद मांडणार?
Follow us
| Updated on: Dec 03, 2019 | 11:27 AM

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला त्यांची कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आपला पुढील प्रवास ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र पंकजांच्या सोबतीला भाजपमधील आणखी दोन नाराज नेत्यांचा मेळा जमण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांवर उघड नाराजी व्यक्त करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मुंबईतील भाजपचं बडं प्रस्थ असलेले प्रकाश मेहता 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर जाण्याची चिन्हं व्यक्त केली जात आहेत. यावेळी भाजपमधील तीन धडाडीचे नेते आपल्या मनातील खदखद (Pankaja Munde BJP Leaders Unhappy) व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना आपल्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पंकजा मुंडेंनी पराभवाची जबाबदारी त्याच दिवशी स्वीकारली असली, तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजी लपत नव्हती. अशातच पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत लवकरच आपल्या पुढील प्रवासाची दिशा स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं होतं.

पंकजा मुंडे यांनी पक्षश्रेष्ठींकडे थेट विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचीच मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे दबाव आणण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली होती. त्यांचा रोख पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांच्याकडे असल्याचं मानलं जात होतं.

गेले काही दिवस पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही जोर धरत होत्या. त्यामुळे पंकजा मुंडे खडसे आणि मेहतांसोबत ‘वेगळ्या निर्णयाची वाट’ चोखाळणार का, अशी चर्चा रंगली आहे. खडसेंनी अद्याप पक्षांतराच्या शक्यता फेटाळल्या नसल्या, तरी प्रकाश मेहता यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना नाराज नसलो, तरी मनातले काही प्रश्न पक्षश्रेष्ठींना विचारणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.

गेल्याच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारासिंह ‘मातोश्री’वारी करुन आले. सलग चार वेळा आमदार राहिलेल्या तारासिंह यांना यंदा तिकीट नाकारलं होतं, त्यामुळे तेही नाराज असल्याची चर्चा होती.

तिकीट नाकारलेल्या एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यांच्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, तर पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, राम शिंदे यासारख्या दिग्गज नेत्यांची पक्षात घुसमट होत असल्याची चर्चा आहे. सत्तेपासून दूर राहिल्याने ‘नाराज गट’ फडणवीसांविरोधात बंड पुकारण्याची शक्यताही वर्तवली जाते. त्यामुळे गोपीनाथ गडावर राजकीय भूकंप (Pankaja Munde BJP Leaders Unhappy) होणार का, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

संबंधित बातम्या :

मुंडेसाहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेन, मुख्यमंत्र्यांचा पंकजांना रिप्लाय

पंकजा मुंडे आता धनंजय मुंडे यांची जागा घेणार?

अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात, पंकजांची भूमिका 12 डिसेंबरला स्पष्ट होईल : संजय राऊत

आधी फेसबुक पोस्ट, आता ट्विटरवर भाजपचा नामोनिशाण नाही, पंकजा मुंडेंचा पुढचा प्रवास ठरला?

…तरच विरोधी पक्षनेत्याच्या बोलण्याला महत्त्व असेल : एकनाथ खडसे

पुढचा प्रवास ठरवण्याची वेळ आली आहे, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.